Suicide  Team Lokshahi
ताज्या बातम्या

प्रेमसंबंधातून 21 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या...

अल्पवयीन मुलीची आई भांडल्यामुळे तरुणाने केली आत्महत्या.

Published by : Team Lokshahi

भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील सोमलवाडा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 21 वर्षीय युवकाने स्वत:च्या शेतात रस्सीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. कृष्णा शालिक अतकरी असे मृताचे नाव आहे. मृत कृष्णा याचं त्याच्याच गावातील अल्पवयीन मुलीबरोबर प्रेम संबंध जुळले होते.

कृष्णा आणि अल्पवयीन मुलीच्या प्रेम संबंधांची माहिती मुलीच्या आईला होताच मुलीच्या आईने कृष्णासोबत भांडण केलं. आता आपली बदनामी गावभर होणार असल्याची भीती बाळगून कृष्णा यांनी स्वतःच्या शेतात जाऊन झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या आधीही त्यांनी दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

काल हे भांडण झाल्यानंतर कृष्णा रात्रभर घरी परतला नाही. त्यानंतर घरच्या लोकांनी शोधाशोध केली मात्र कृष्णा दिसला नाही. आज सकाळी गावातील एका व्यक्तीला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने याची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत मृतदेह तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा