Team Lokshahi
ताज्या बातम्या

धक्कादायक! 21 वर्षीय महिलेचे अपहरण करून बलात्कार

ट्रॅव्हल्स चालकाला पोलिसांनी केली अटक

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमोल धर्माधिकारी | पुणे : एका 21 वर्षीय महिलेचे ट्रॅव्हल्समधून अपहरण करत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. एका ट्रॅव्हल्स चालकाने पती खाली उतरताच बस अचानक सुरू करून कात्रज आणि स्वारगेट येथे महिलेवर दोनदा बलात्कार केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली असून आरोपीला अटक केली आहे. नवनाथ शिवाजी भोंग असे आरोपीचे नाव आहे.

पुण्यात एक 21 वर्षीय महिला काम शोधण्यासाठी बाहेर गावावरून पतीसोबत पुण्यात आली होती. रात्र झाल्याने पुण्यात राहण्यासाठी ते खोली शोधत होते. यावेळी संबंधित आरोपीने या दाम्पत्याला ट्रॅव्हल्समध्येच झोपण्यास सांगितले. त्यानंतर ट्रॅव्हल्स अचानक सुरू करून कात्रज परिसरात घेऊन जात महिलेचे अपहरण केले. व स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात फुटपाथवर या महिलेला नेत तिच्यावर बलात्कार केला.

तर, पुन्हा बस कात्रज परिसरात नेली आणि तेथील फुटपाथवर दुसऱ्यांदा बलात्कार केला. दरम्यान महिलेचा पती तिला शोधत होता. पण, बस व पत्नी न सापडल्याने त्याने पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यानंतर हा प्रकार उजेडात आला. दरम्यान, पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

ITR Filing Extension : करदात्यांना दिलासा; आयटीआर फाइल करण्यासाठी मुदतवाढ

Beed Rain Update : बीडमध्ये पावसाचा कहर; आज शाळांना सुट्टी जाहीर

Latest Marathi News Update live : काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार अजित पवारांच्या भेटीला

Government Websites : सरकारी संकेतस्थळे आता मराठीत होणार