ताज्या बातम्या

नांदेड शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ मृत्यू; मृतांमध्ये १२ नवजात बालकांचा समावेश

नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील लहान मुलांच्या वार्डात मागील 24 तासात 12 नवजात शिशूंचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे.

Published by : Team Lokshahi

नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील लहान मुलांच्या वार्डात मागील 24 तासात 12 नवजात शिशूंचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. रुग्णालयातील अन्य सर्व विभाग मिळून मागील 24 तासातील मृतांचा आकडा हा सुमारे 24 असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नवजात शिशुंमध्ये अत्यंत शेवटच्या क्षणी यातील अनेक नवजात शिशु हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले होते.

यातील बहुतांश बालकांचे जन्मजात वजन कमी असणे जन्मजात फुफुसांचा त्रास असणे अशा परिस्थितीमध्ये ही नवजात बालके शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये दाखल झाली होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण यश मिळाले नाही. अजूनही बालकांच्या वॉर्डमध्ये तब्बल 60 बालकांवर विविध आजरांसाठी उपचार सुरू आहेत. नवजात शिशू व्यतिरिक्त मृत्यू झालेल्या मध्ये साप चावल्याने मृत्यू झालेल्या मोठ्यांची संख्या अधिक आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक, मतदानाला सुरुवात

Nepal : नेपाळ सरकारने समाजमाध्यमांवरील बंदी उठवली

Vice-Presidential Election : उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक; बीजेडी आणि बीआरएस तटस्थ राहणार

Saamana Editorial : पितृपक्षात ‘कौन बनेगा उपराष्ट्रपती?’ हाच प्रश्न आहे; उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर सामनातून भाष्य