ताज्या बातम्या

26/11 Attack Sadanand Date : 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील नायकाची ओळख, कोण आहेत आयपीएस अधिकारी सदानंद दाते?

26/11 च्या मुंबई हल्ल्यातील नायक सदानंद दाते: कोण आहेत हे शौर्य पदक विजेते आयपीएस अधिकारी?

Published by : Prachi Nate

26/11 मुंबईवरील हल्ला प्रकरणातील आरोपी दहशतवादी आणि पाकिस्तानी सैन्यातील माजी डॉक्टर तहव्वूर हुसेन राणाला आज उशिरा किंवा उद्या पहाटे लवकर भारतात आणण्याची शक्यता आहे. तहव्वूर राणाला अमेरिकेतून विशेष विमानाने भारतात आणलं जाणार आहे. तहव्वूर राणाला NIA च्या कोठडीत ठेवण्याची शक्यता आहे. गुप्तचर आणि तपास अधिकाऱ्यांचा विशेष पथक तहव्वूर राणा सोबत असणार आहे. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे.

कोण आहेत आयपीएस अधिकारी सदानंद दाते?

ज्यावेळेस 26-11-2008 मध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्या करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये 166 लोक मारले गेले होते. त्यावेळी महाराष्ट्र कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांनी शौर्याची आणि कर्तव्यदक्ष कामगिरी बजावली होती. ते 1990 च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असले तरी त्यांनी वेळोवेळी राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयए इतर केंद्रीय एजन्सींमध्येही जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सदानंद दातेंनी शोर्याने लढा दिला. ज्यावेळी कामा हॉस्पिटलमध्ये हल्ला होण्याची माहिती दातेंपर्यंत पोहचली त्यावेळेस सदानंद दाते क्षणार्धात त्यांच्यासोबत असलेल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. यादरम्यान दाते दहशतवाद्यांशी धैर्याने लढत असताना त्यांना गंभीर दुखापतही झाली. सदानंद दाते यांना नंतर राष्ट्रपती शौर्य पदक देण्यात आले.

कोण आहे तहव्वूर राणा?

कॅप्टन तहव्वुर हुसेन राणा याचा जन्म 12 जानेवारी 1961 साली झाला. तो एक पाकिस्तानी माजी लष्करी डॉक्टर आहे, ज्यांने पाकिस्तान सैन्यात सेवा बजावली होती. नागरिकत्व मिळाल्यानंतर तो कॅनडाला गेला आणि इमिग्रेशन सेवा व्यवसायी बनला. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने 21जानेवारी 2025 रोजी जारी केलेल्या आदेशात राणाच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा केला.

2011 मध्ये, त्याला लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी गटाला पाठिंबा देण्याबद्दल आणि डॅनिश वृत्तपत्र जिलँड्स-पोस्टेनवर हल्ला करण्याचा कट रचल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. 17 जानेवारी 2013 रोजी त्याला 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी आणि भारताने फरार घोषित केलेल्या पाकिस्तानी वंशाच्या कॅनेडियन व्यापारी तहव्वुर राणा यांचा जामीन अर्ज अमेरिकेच्या न्यायालयाने फेटाळून लावला होता, आता तो भारतात येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा