तहव्वुर राणाला काल भारतात आणलं गेले. दीर्घ काळापासून भारत तहव्वूर राणाच्या प्रर्त्यापणाची मागणी करत होता. काल त्याला दिल्लीत आणलं गेले. त्यानंतर विमानतळावरच त्याची मेडिकल चेकअप करण्यात आली होती. त्यानंतर तहव्वूर राणा याला रात्री पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं.
विमानतळावर आल्यानंतर राणाला अडीच तासानंतर कोर्टात आणण्यात आलं. त्यानंतर कोर्टात सुनावणी सुरू झाली. एनआयएच्या वकिलांनी राणाची 20 दिवसाची कोठडी मागितली. कोर्टातून राणाला थेट एनआयएच्या मुख्यालयात नेण्यात येणार आहे.
सुनावणी बंद खोलीत झाली असून सुनावणीच्यावेळी एनआयएच्या वकिलांनी खटल्याशी संबंधित काही तथ्य समोर ठेवले. युक्तिवाद एनआयएच्या वकिलांनी केला. त्यानंतर राणा याला 18 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.