राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झालेला बघायला मिळत आहे. राज्यभरत आता कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. सध्या राज्यभरात एकूण 278 सक्रिय रुग्ण आहेत. सध्या वैद्यकीय यंत्रणा अक्शन मोड वर आली आहे. याच कोरोनाचा मुंबईसह ठाण्यामध्ये ही शिरकाव झाला असुन कल्याण डोंबिवली मध्ये 4 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे महानगपालिकेकडून सांगण्यात आले आहे. त्यापैकी कल्याण मधील एका 47 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कल्याण डोंबिवलीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्या महिलेच्या वैद्यकीय तपासणी अहवालानुसार तिला मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी माहिती पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी दिली. चार जणांपैकी एका रुग्णाला सौम्य लक्षणे असल्यामुळे उपचारा नंतर घरी सोडण्यात आले आहे. अन्य दोन रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहेत. कल्याण डोंबिवली भागात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मात्र नागरिकांनी घाबरून न जाता प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, किव्हा मास्क चा वापर करावा असे आवाहन पालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे. कल्याण मध्ये रुक्मिणीबाई रुग्णालय,डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कोरोना विलगीकरण कक्ष तसेच ऑक्सिजन पुरवठा , जिभेच्या चाचण्यांची सुविधा ही करण्यात आली असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.