रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. त्या सोहळ्याला तिथीनुसार आज ३५० वर्षं पूर्ण झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तिथीनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडत आहे.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. त्यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय मंडळींनी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर हजेरी लावली आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत.
1) शिवरायांच्या कल्पनेतील स्वराज्य आणायचं आहे. प्रतापगड प्राधिकरण कराव आणि त्यांचे अध्यक्ष खासदार उदयनराजे यांची निवड करण्यात आली आहे.
2) मुंबईतील कोस्टल रोडला संभाजी महाराजांचे नाव
3) शिवसृष्टी उभारण्यासाठी 50 कोटींची घोषणा