पुण्यात कुख्यात गुंड गजानन मारणे टोळीचा कोथरूड मध्ये धुमाकूळ पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या आँफीसमध्ये सोशल मिडियाचे काम करणाऱ्या एकाला मारणे टोळीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या नाकावर गंभीर जखम झाली आहे.
हाँर्न वाजवत गाड्यांचा ताफा घेऊन जाताना वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी व्हिडीओ काँल करून जखमींची चौकशी केली. यादरम्यान सर्व आरोपी नुकतेच जामीनावर बाहेर आले आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून मारणेचा भाचा फरार आहे.
मारहाण केलेल्या आरोपींची नावे
१)अमोल विनायक तापकीर.
२)ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू .
३)किरण कोंडीबा पडवळ.
4)बाबू पवार (गजाचा भाचा)