सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी येत असतात. सण उत्सवाच्या काळामध्ये दूध आणि दुग्धयुक्त पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. यातच आता धुळे शहरातील एमआयडीसीमध्ये जवळपास 250 ते 300 किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई करत पनीर जप्त केले आहे.