Himachal Monsoon Update : सध्या पाऊस सगळीकडे थैमान घालत आहे. यातच हिमाचल प्रदेशात 20 जूनपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. यामध्ये आतापर्यंत 276 मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यापैकी 143 लोक भूस्खलन, पूर तसेच घर कोसळली आहेत. रस्ते अपघातात 133 जणांनी जीव गमावला असल्याची माहिती मिळत आहे.
एचपीएसडीएमएने म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत पावसाळामुळे हिमाचल प्रदेशाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे 366 रस्ते बंद करण्यात आले असून 929 ठिकाण्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. दरम्यान 139 पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्या आहेत.
कुल्लू जिल्ह्यात 125 रस्ते बंद आहेत, 281 वीज वितरण ट्रान्सफॉर्मर (डीटीआर) बंद पडले असून ५६ पाणीपुरवठा योजनांवर याचा परिणाम झाला आहे. त्यानंतर मंडीमध्ये 174 रस्ते अडथळ्यात आले आहेत, 98 डीटीआर काम करत नाहीत आणि 60 पाणी योजना विस्कळीत झाल्या आहेत. किन्नौरमधील लग व्हॅली, मणिकरण, सैंज, जिभी, मंडी-जोगिंदरनगर आणि थांगी-चरंग भागांतील अनेक परिसरांचा संपर्क पूर्णतः तुटल्याचे फील्ड अहवालांमधून स्पष्ट झाले आहे. वीज आणि पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र सतत पडणारा पाऊस आणि नव्याने होणाऱ्या भूस्खलनामुळे या कामात अडथळे येत आहेत. प्रशासनाने नागरिकांना संवेदनशील भागांमध्ये प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून, मान्सून अजूनही सक्रिय असल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.