ताज्या बातम्या

Chhatrapati Shivaji Maharaj : 396 वी शिवजयंती उत्साहात; शिवनेरीपासून राज्यभर दुमदुमला शिवगर्जना!

महाराष्ट्राचे आराध्यदैवत Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त राज्यभरात अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे.

Published by : Varsha Bhasmare

महाराष्ट्राचे आराध्यदैवत Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त राज्यभरात अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच Shivneri Fort येथे शिवभक्तांची गर्दी उसळली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी गड दुमदुमून गेला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा जोजावत जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. किल्ले शिवनेरीवर 396 वी शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे.

शिवाई देवी मंदिरात शिवाई देवी आणि शिवरायांचा अभिषेक पार पडला. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.राज्यातील विविध भागांतही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माने पावन झालेले दुर्गतीर्थ किल्ले शिवनेरी येथे आयोजित शिवजन्मोत्सवात त्यांचे बालरूप असलेला पाळणा झुलवला. याप्रसंगी राजामाता जिजाऊ माँसाहेब यांच्या लेकींनी मायेने पाळणा गात वातावरण शिवमय केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा