4 corporators of Shiv Sena Thackeray group in Kalyan Dombivli Municipal Corporation not reachable 
ताज्या बातम्या

Shiv Sena Thackeray Group : महापौरपदाच्या निवडीपूर्वी उद्धव ठाकरेंना जबर धक्का; तब्बल एवढे नगरसेवक नॉटरिचेबल

Kalyan Dombivli Municipal Corporation not Reachable : महापालिका निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले असले तरी महापौरपदाचा खेळ आता रंगात आला आहे.

Published by : Riddhi Vanne

Kalyan Dombivli Municipal Corporation not Reachable : महापालिका निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले असले तरी महापौरपदाचा खेळ आता रंगात आला आहे. राज्यात भाजप सर्वाधिक जागा जिंकूनही अनेक ठिकाणी बहुमतापासून दूर राहिला आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांच्या मदतीवरच अवलंबून राहावे लागणार आहे.

कल्याण–डोंबिवली महापालिकेतही अशीच रस्सीखेच सुरू आहे. येथे शिंदे गटाला ५३ तर भाजपला 50 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे “आमचाच महापौर” असा दोन्ही बाजूंनी दावा केला जात आहे. याच दरम्यान राजकारणाला नवा वळण मिळाले आहे.

ठाकरे गटाचे चार नगरसेवक अचानक संपर्काबाहेर गेले असून, यामुळे समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. 11 पैकी फक्त 7 नगरसेवक पक्ष कार्यालयात पोहोचले आहेत. काहीजण लवकरच येतील, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. मुंबई महापालिकेतही भाजपला बहुमत न मिळाल्याने त्यांना मित्रपक्षाच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये महापौर कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

थोडक्यात

  1. महापालिका निवडणुकींचे चित्र आता स्पष्ट झाले

  2. महापौरपदाचा खेळ सुरू झाला

  3. भाजपने राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्या

  4. अनेक ठिकाणी भाजप बहुमतापासून दूर

  5. सत्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांच्या मदतीवर अवलंबून रहावे लागणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा