ताज्या बातम्या

Ajanta Caves : आग्या मोहळाच्या मधमाश्यांचा थायलंडच्या 40 पर्यटकांवर हल्ला

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात आग्या मोहळाच्या मधमाश्यांनी पुन्हा एकदा पर्यटकांवर हल्ला चढवला मंगळवारी घडलेल्या या घटनेत थायलंडहून आलेल्या पर्यटकांच्या समूहावर अचानक हल्ला झाला.

Published by : Rashmi Mane

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात आग्या मोहळाच्या मधमाश्यांनी पुन्हा एकदा पर्यटकांवर हल्ला चढवला असून, मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत थायलंडहून आलेल्या पर्यटकांच्या समूहावर अचानक हल्ला झाला. या हल्ल्यात एक महिला पर्यटक गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारीपासून केवळ तीन महिन्यांत मधमाश्यांच्या हल्ल्याची ही पाचवी घटना आहे.

हल्ल्याचा थरार तर पर्यटकांची धावपळ

सायंकाळी 5 वाजता लेणी क्रमांक 26 समोरील परिसरात आग्या मोहळ अचानक सक्रिय झाला आणि त्यातील मधमाश्यांनी थेट 40 पर्यटकांवर झडप घातली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये एकच गोंधळ उडाला. काहीजण ओरडत पळू लागले, तर काहीजण आश्रयासाठी जवळच्या गुहांमध्ये लपले. हल्ल्याच्या धक्क्याने एका महिला पर्यटक बेशुद्ध पडली.

शासकीय यंत्रणांची तातडीची कारवाई

भारतीय पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पर्यटकांना मदत केली. गंभीर जखमी महिलेला तत्काळ जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेतून अजिंठा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर सध्या उपचार सुरू असून स्थिती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

परिसरातील वाढते तापमान आणि पाण्याचा अभाव कारणीभूत?

सध्या अजिंठा परिसरात तापमान 41 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून, त्यामुळे मधमाश्या पाण्याच्या शोधात भटकत आहेत. परिणामी पर्यटकांवर अचानक होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. हवामानातील या बदलामुळे प्राचीन लेण्यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर

Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे निधन

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप