ताज्या बातम्या

भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये मुंबई पालिकेचे 55 कर्मचारी बडतर्फ 134 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Published by : Siddhi Naringrekar

भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये मुंबई पालिकेचे 55 कर्मचारी बडतर्फ 134 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, कोरोना काळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. मुंबई महापालिकेने पालिकेच्या विविध खात्यात गेल्या काही कालावधीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी कर्मचारी यांच्या विरोधात काय कारवाई केली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल असलेल्या १४२ प्रकरणात २०० कर्मचारी समाविष्ट आहेत. या १४२ पैकी १०५ प्रकरणांमध्ये खटला दाखल करण्याची ‘अभियोग पूर्व मंजुरी’ महापालिका प्रशासनाने दिली आहे.

पालिकेने विविध खात्यात झालेल्या भ्रष्टाचारामध्ये चौकशीअंती दोषी ठरलेल्या ५५ कर्मचाऱ्यांना सेवेतून तडकाफडकी बडतर्फ केले आहे. तसेच, १३४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. या कोरोना नियंत्रणासाठी पालिकेने आतापर्यत ५ हजार कोटींचा खर्च केला असून त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप, काँग्रेसकडून वेळोवेळी करण्यात आले.

मुंबई महापालिका प्रशासनाने कामकाजात पारदर्शकता जपावी, नियमांना बांधील राहूनच कार्यवाही करावी, भ्रष्टाचाराच्या प्रवृत्तीविरोधात ठामपणे भूमिका घ्यावी, असा दंडक महापालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल यांनी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारतानाच घालून दिला आहे. काही वर्षात रस्ते, शैक्षणिक साहित्य खरेदी, कीटकनाशक खरेदी, मूषक संहार, भंगार विक्री, टीडीआर, भूसंपादन, शालेय पोषण आहार, टॅब खरेदी, अनधिकृत बांधकामे आदी बाबतीत भ्रष्टाचार, घोटाळा झाल्याचे आरोप विरोधी व सत्ताधारी पक्षाने केले आहेत. अनेक प्रकरणे उघडकीस आली.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...