ताज्या बातम्या

Assam Earthquake : रशियानंतर आता आसाममध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

रशियानंतर आता आसाममधील गुवाहाटी येथे जमीन भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. आज रविवारी 14 सप्टेंबरला आसाममधील उदलगुरी येथे तीव्र भूकंप झाला.

Published by : Prachi Nate

रशियानंतर आता आसाममधील गुवाहाटी येथे जमीन भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. आज रविवारी 14 सप्टेंबरला आसाममधील उदलगुरी येथे 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र उदलगुरी येथे पृथ्वीपासून पाच किलोमीटर खोलीवर नोंदवले गेले.

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार रविवारी संध्याकाळी आसाममधील उदलगुरी जिल्ह्यात तसेच त्याच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, त्याचसोबत आसाम व्यतिरिक्त, या भूकंपाचे धक्के भूतान आणि पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भागातही जाणवले.

ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन लोक घाबरून घराबाहेर पडले. या घटनेनंतर अद्याप कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी झाली नसल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली आहे.

त्याचसोबत तेथील केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी देखील ट्वीट करत म्हटलं आहे की, "आसाममध्ये मोठा भूकंप. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी मी प्रार्थना करतो. सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन!" नुकतेच दोन आठवड्यांआधी 2 सप्टेंबर रोजी देखील आसाममधील सोनितपूर येथे 3.5 रिश्टर स्केलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 IND vs PAK Live Update : पाकिस्तानची टोळी 127 धावांवर बाद, भारतासमोर 128 धावांचे आव्हान

PM Narendra Modi On Congress : “मी शिवाचा भक्त, विषही प्राशन करेन” पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना दागिने खरेदी करण्यासाठी उत्तम योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार