ताज्या बातम्या

उरण हत्याकांड प्रकरणातील दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी

यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीचा रायगड जिल्ह्याच्या उरणमध्ये हत्या झाली.

Published by : Dhanshree Shintre

यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीचा रायगड जिल्ह्याच्या उरणमध्ये हत्या झाली. यशश्रीची हत्या लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा कुटुंबीयांचं म्हणणं आहे. दाऊद शेख नावाच्या व्यक्तीने ही हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.

त्या दिवशी यशश्री सकाळी 11 वाजता मैत्रीणीकडे गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. थेट तिचा मृतदेहच उरण रेल्वे स्टेशनजवळ सापडला असल्याचं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. ती बेलापूरला नोकरीला होती. हाफ डे घेऊन ती कामावरून लवकर निघाली होती, अशी माहिती समोर आली होती.

याच पार्श्वभूमीवर उरण हत्याकांड प्रकरणात आरोपी दाऊदला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पनवेल सत्र न्यायालयाचा निर्णय आहे. काल गुलबर्ग्यातून दाऊदला अटक करण्यात आले होते. मात्र आता त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा