Kathua cloudburst  
ताज्या बातम्या

Kathua cloudburst : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी; कठुआमध्ये 7 जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये नैसर्गिक आपत्तींच्या घटना सातत्याने घडत आहेत.

Published by : Team Lokshahi

(Kathua cloudburst ) जम्मू-काश्मीरमध्ये नैसर्गिक आपत्तींच्या घटना सातत्याने घडत आहेत. किश्तवाडमधील भीषण घटनेनंतर आता कठुआ जिल्ह्यातील जोध घाटी व जंगलोट परिसरात शनिवारी रात्री झालेल्या ढगफुटी व मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. अचानक आलेल्या पुरासह भूस्खलनाच्या घटनांत 7 जणांचा बळी गेला असून त्यात 5 लहान मुलांचा समावेश आहे.

बागरा या गावात डोंगर कोसळून एका महिलेचा आणि तिच्या मुलीचा मृत्यू झाला. तर सुरमुद्दीन (32) यांच्यासह त्यांची दोन मुले फानू (6) आणि शेदू (5) मिळून 5 जणांचा मृत्यू झाला. जंगलोटमध्ये रेणू देवी (39) व तिची मुलगी राधिका (9) भूस्खलनात दबल्यामुळे मृत्यू पावल्या. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन व सुरक्षा दलाने तात्काळ मदतकार्य सुरू केले.

मुसळधार पावसामुळे जम्मू-पठाणकोट रेल्वेमार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. रस्ते बंद झाल्याने बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत आहे. आतापर्यंत 15 जखमींना सुरक्षित बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, किश्तवाडच्या चिशोती गावात 14 ऑगस्टला झालेल्या ढगफुटीनंतर चौथ्या दिवशीदेखील शोधमोहीम सुरू आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा 60 वर पोहोचला असून सुमारे 80 नागरिक बेपत्ता आहेत. आतापर्यंत 167 जणांना जिवंत वाचवण्यात आले आहे.प्रशासन यंत्रणा या संदर्भात सज्ज असून पुढील बचाव कार्य सुरु आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा