7th Pay Commission | central govt employees
7th Pay Commission | central govt employees  team lokshahi
ताज्या बातम्या

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, पुढील महिन्यात डीए वाढीसह या मोठ्या घोषणा होणार

Published by : Shubham Tate

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. याबाबत सरकारकडून लवकरच घोषणा केली जाणार आहे. अहवालानुसार, सरकारकडून सप्टेंबर महिन्यात महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सणासुदीच्या आधी पुढील महिन्यात महागाई भत्त्यात वाढीसह थकबाकी आणि फिटमेंट फॅक्टरवर मोठी घोषणा केली जाऊ शकते. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होऊ शकते. (7th pay commission latest update da hike 8 month arrear fitment factor may be decided in next month)

4 टक्के डीए वाढ

वृत्तानुसार, सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करू शकते. सप्टेंबर महिन्यात नवरात्रीच्या काळात सरकार कर्मचाऱ्यांना डीए वाढीची भेट देऊ शकते, असे बोलले जात आहे. 4 टक्क्यांच्या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 38 टक्के होईल. सध्या कर्मचाऱ्यांना ३४ टक्के डीए मिळतो. सरकारने यावर्षी मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ केली होती. त्यानंतर डीएमध्ये ३ टक्के वाढ करण्यात आली.

थकबाकीबाबत निर्णय होण्याची शक्यता

पुढील महिन्यात सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रलंबित थकबाकी त्यांना देण्याची घोषणाही करू शकते. कोरोनामुळे सरकारने जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत कर्मचाऱ्यांचा डीए रोखून धरला होता. कर्मचाऱ्यांची थकबाकी भरण्याची मागणी सातत्याने होत आहे. पुढील महिन्यात 18 महिन्यांची थकबाकी डीए भरण्याची घोषणा सरकार करेल अशी अपेक्षा आहे.

फिटमेंट फॅक्टरवर घोषणा केली जाऊ शकते

डीए वाढीबरोबरच फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणीही कर्मचाऱ्यांकडून अनेक दिवसांपासून होत आहे. सध्या तो 2.57 टक्के आहे, तो वाढवून 3.68 टक्के करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वृत्तानुसार, नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरवर निर्णय येऊ शकतो.

महायुतीसह मविआमध्ये उमेदवारी अर्जासाठी लगबग

Shrikant Shinde: "राज ठाकरेंचे विचार हे शिवसेनेचे विचार"

काँग्रेसमध्ये नाराज असलेले काँग्रेस नेते आबा बागुल आजपासून रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारात सक्रिय

Sanjay Raut : फडणवीस लवंगी फटाक्याइतकाही स्फोट करु शकत नाहीत

Sanjay Raut : निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा ?