ताज्या बातम्या

भयंकर! ओडिशातील एका व्यक्तीच्या फुफ्फुसात सापडला 8 सेमीचा चाकू; तीन वर्षांनी झाली शस्त्रक्रिया

तुटलेल्या चाकूचा तुकडा गेल्या तीन वर्षांपासून त्या माणसाच्या शरीरात होता. त्याच्या कोणत्याही अवयवाला इजा झाली नाही.

Published by : Rashmi Mane

ओडिशातील बेरहमपूर येथील एमकेसीजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पथकाने एका 24 वर्षीय तरुणाच्या फुफ्फुसातून आठ सेंटीमीटर लांबीचा तुटलेला चाकूचा तुकडा काढला. एमकेसीजी रुग्णालयाने ही माहिती दिली आहे. तुटलेल्या चाकूचा तुकडा गेल्या तीन वर्षांपासून त्या माणसाच्या शरीरात होता. त्याच्या कोणत्याही अवयवाला इजा झाली नाही. मानेवर वार केल्यानंतर, दोन वर्षे त्याला कोणतीही लक्षणे दिसली नाहीत.

एमकेसीजीकडून मिळालेल्या माहितीनुसार, कार्डिओथोरॅसिक अँड व्हॅस्क्युलर सर्जरी (सीटीव्हीएस) विभागाच्या असोसिएट प्रोफेसर शारदा प्रसन्ना साहू यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने जिल्ह्यातील कवी सूर्यनगर येथील संतोष दास यांच्या फुफ्फुसातून थोरॅकोटॉमी ऑपरेशन केले आणि चाकूचा तुकडा काढला.

डॉ. साहू म्हणाल्या की, स्टील आणि धारदार चाकूची लांबी सुमारे 8 सेमी होती आणि त्याची रुंदी व जाडी अनुक्रमे 2.5 सेमी आणि 3 मिमी होती. डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णाची प्रकृती ठीक आहे आणि तो आता अतिदक्षता विभागात (ICU) निरीक्षणाखाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा