आपण अनेकदा रस्त्याने चालत असतो. अचानक कानठिळ्या बसतील असा आवाज काढत एखादी दुचाकी वेगाने निघून जाते. कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवण्याचं हल्ली फॅडच आल आहे. मात्र त्यामुळे ध्वनीचं मोठं प्रदूषण होत. त्यासाठीच, पोलिसांनी यावर एक भन्नाट आयडिया केली आहे. अशा सायलेन्सरचं अनोखं रॉकेट बनवले आहे.
(चौकात उभं केलेल्या रॉकेटचे व्हिज)) भर चौकात उभारण्यात आले आहे, ते कोणतंही शिल्प नसून हे रॉकेट आहे. तेही वाहतूक पोलिसांनी बनवलेल आहे. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कर्णकर्कश बुलेटच्या सायलेन्सरवर मोठी कारवाई केली. जप्त केलेल्या 300 बुलेटच्या सायलेन्सरचं रॉकेट बनवल आहे.. विशेष म्हणजे संभाजीनगर शहरातील मुख्य क्रांती चौक येथे हा बसवून नियम तोडणाऱ्यांना एक संदेश दिला आहे.
पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे. त्यावेळेस ते म्हणाले की, "तरुण पिढी कंपनीने दिलेले बुलेटचे सायलेन्सर बदलून त्या ऐवजी कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवतात आणि ध्वनिप्रदूषण करतात. एवढेच काय तर मॉडीफाय सायलेन्सरमुळे अनेकदा गाड्यांना आगही लागली आहे. पोलिसांनी कारवाई करून ते भंगारात न घालता शहराची शोभा वाढवेल असे सुंदर रॉकेट बनवल आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे. त्यावेळेस ते म्हणाले की, "वाहन चालवताना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बुलेट धारकांना हा एक मोठा धडा आहे, मॉडीफाय केलेले सायलेन्सर वापरले तर कारवाई तर होईलच मात्र तुमचे सायलेन्सर काढून ते असे सुशोभीकरणासाठी वापरले जाईल. म्हणजे पुन्हा कुणाचीही नियम मोडण्याची हिंमत होणार नाही".