मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुसाखेडी येथील चौधरी पार्क कॉलनीत राहणारी राधिका दुबे ही अकरावीतील विद्यार्थिनी शुक्रवारी घरात एकटी असताना गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
घटनेच्या वेळी राधिकाचे आई-वडील कामावर गेले होते. ते घरी परतले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा उघडून पाहिल्यावर राधिका गळफास घेतलेली दिसली. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
सुसाईड नोट नाही, पण दोन चित्रं मात्र सापडली
घराची तपासणी करताना पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही. मात्र, भिंतीवर दोन चित्रं दिसली.
एका चित्रात एक मुलगी हात हलवत ‘गुडबाय’ करताना दिसते,
तर दुसऱ्या चित्रात डोंगर आणि शांत परिसर काढलेला आहे.
या चित्रांचा राधिकेच्या मृत्यूशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.
कुटुंबीय म्हणाले – वागण्यात बदल जाणवत होता
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, राधिका शांत स्वभावाची होती आणि तिला चित्रकलेची आवड होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तिच्या वागण्यात थोडा बदल जाणवत होता. मृत्यूपूर्वी काढलेले ‘गुडबाय’ चित्र पाहून कुटुंबीय हादरून गेले आहेत.
मोबाईल, नोटबुक जप्त; शिक्षकांचीही चौकशी
पोलिसांनी राधिकाचा मोबाईल फोन, तिची नोटबुक आणि काढलेली चित्रं जप्त केली आहेत. मोबाईलमधील माहिती आणि तिच्या लिखाणातून काही सुगावा मिळतो का, याचा तपास केला जात आहे. तसेच राधिकेच्या शिक्षक आणि परिवारातील लोकांचीही चौकशी सुरू आहे. राधिकाने अभ्यासाच्या ताणातून की इतर कोणत्या कारणामुळे हे टोकाचं पाऊल उचललं, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
थोडक्यात
मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या
मुसाखेडी येथील चौधरी पार्क कॉलनीत राहणारी राधिका दुबे ही अकरावीतील विद्यार्थिनी गळफास घेतला.
शुक्रवारी घरात एकटी असताना गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.