ताज्या बातम्या

Solapur News : सोलापूरमध्ये एका स्फोटने होत्याचं नव्हतं झालं! एसी फुटला अन् घरभर आगीचे रौद्ररूप

जुन्या विडी घरकुल भागातील गाडगी नगर येथे गुरुवारी दुपारी भीषण अपघात घडला. घरात लावलेल्या एअर कंडिशनरमध्ये अचानक स्फोट झाल्याने 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

Published by : Team Lokshahi

सोलापूर जिल्ह्यातील जुन्या विडी घरकुल भागातील गाडगी नगर येथे गुरुवारी दुपारी भीषण अपघात घडला. घरात लावलेल्या एअर कंडिशनरमध्ये अचानक स्फोट झाल्याने 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

मृत महिलेचे नाव पल्लवी प्रवीण सग्गम असे सांगितले जाते. त्या घरात असताना एसी फुटला आणि त्यानंतर विद्युत शॉर्टसर्किटमुळे काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले.

आग एवढ्या झपाट्याने पसरली की पल्लवी यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. शेजाऱ्यांनी आगीच्या ज्वाळा पाहताच आरडाओरडा केला आणि लगेचच पोलिस व अग्निशमन दलाला पाचारण केले.

थोड्याच वेळात अग्निशमन पथकाने घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे प्रयत्न केले. बराच वेळ लढा देऊन आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, आतमध्ये सापडलेला पल्लवी यांचा मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले.

या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांनी अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी घरगुती विद्युत उपकरणांची वेळोवेळी तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा