Digital Arrest : मुंबईत डिजिटल अरेस्ट म्हणजे आभासी कैदच्या नावाखाली फसवणुकीच्या प्रकरणात 58 कोटी रुपये उकळल्याची मोठी घटना समोर आली आहे. 72 वर्षीय एका वृध्द व्यावसायिकाला सायबर गुंडांनी ईडी आणि सीबीआय अधिकारी असल्याचा भासवून धमकी दिली आणि पैसे घेतले. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून इतर आरोपींचीही शोध घेत आहे.
वृद्ध व्यावसायिकाला १९ ऑगस्टपासून 8 ऑक्टोबरपर्यंत डिजिटल अरेस्ट असल्याचा भासवून 58 कोटी 13 लाख रुपये 18 वेगवेगळ्या खात्यांतून घेतले गेले. सायबर गुंडांनी ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचा खोटा दावा केला आणि मनी लॉंड्रींगच्या प्रकरणात आरोपी असल्याची भीती दाखवली.
देशातील सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट फसवणूक
मुंबईतील या प्रकरणात 58 कोटी रुपयांची फसवणूक झाल्यामुळे ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट फसवणूक ठरली आहे. याआधी मुंबईत 20 कोटी आणि दिल्ली येथे 23 कोटींची फसवणूक नोंदवली गेली होती.
सायबर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली
अब्दुल नासिर खुल्ली, अर्जुन कडवासरा आणि भाऊ जेठाराम कडवासरा यांना अटक झाली आहे. त्यांच्यापैकी काही खाते गोठवण्यात आले असून आणखी आरोपींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?
डिजिटल अरेस्ट ही सायबर फसवणुकीची एक पद्धत आहे ज्यात सायबर गुंड व्हिडिओ कॉलवर खोटे सीबीआय, ईडी किंवा पोलिस अधिकारी असल्याचा भासवून लोकांना फसवतात. ते नकली पोलीस ठाणे दाखवतात आणि गुन्ह्यांच्या चौकशीतून आभासी कैद झाल्याचे सांगतात. पण प्रत्यक्षात अशी कोणतीही डिजिटल अरेस्ट नसते. घाबरलेल्या लोकांकडून पैसे घेण्यासाठी हे सगळं केलं जातं. मुंबईत गेल्या वर्षी 102 अशा प्रकारचे प्रकरणे नोंदवली गेली आहेत.