Rohit Pawar On Gopichand Padalkar : "एक बेंटकस कार्यकर्ते...." पडळकरांच्या 'त्या' विधानांवर रोहित पवारांचे प्रत्युत्तर  Rohit Pawar On Gopichand Padalkar : "एक बेंटकस कार्यकर्ते...." पडळकरांच्या 'त्या' विधानांवर रोहित पवारांचे प्रत्युत्तर
ताज्या बातम्या

Rohit Pawar On Gopichand Padalkar : "एक बेंटकस कार्यकर्ते...." पडळकरांच्या 'त्या' विधानांवर रोहित पवारांचे प्रत्युत्तर

रोहित पवार: पडळकरांच्या वादग्रस्त विधानांवर रोहित पवारांचे प्रत्युत्तर, महाराष्ट्र धर्माचा लढा.

Published by : Riddhi Vanne

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत, त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या वडिलांचाही अपमान केला, दरम्यान यावरून राज्यात आता वातावरण चांगलंच तापलं आहे. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सांगलीत सभा घेत चांगलीच कान उघडणी केली.

रोहित पवार म्हणाले की, "एक बेंटकस कार्यकर्ते कशा पद्धतीने बोलतो त्याचा निषेध करण्यासाठी एकत्र आलो आहोत. हा लढा फक्त एका वक्तव्याचा नसून विचारांचा आणि महाराष्ट्र धर्माचा आहे. आम्ही देखील खालच्या पातळीवर जाऊन बोलू शकतो. तिथे पाहिजे तिथे आम्ही आक्रमक बोलतो. आम्ही राजकारण शब्द कधी खालच्या पातळीवर बोललं नाही. बेनामी जाहिरात देऊन नटसम्राट,नटवरलाल होऊ शकता, लोकनेता होऊ शकत नाही. पण तुम्ही लोकनेता होऊ शकत नाही. लोकनेता होण्यासाठी लोकांचा पाठिंबा तिथे लागतो. "

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा