ताज्या बातम्या

Mumbai BEST Bus : मेट्रो स्थानकाजवळ रस्ता खचला, अन् मुंबईत बेस्ट बसचा अपघात

मुंबईत गिरगाव मेट्रो स्टेशनजवळ आज सकाळी रस्ता खचून एक बेस्टची प्रवासी बस तब्बल 5 फूट खोल खड्ड्यात अडकली.

Published by : Team Lokshahi

मुंबईत सलग पडणाऱ्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. गिरगाव मेट्रो स्टेशनजवळ आज सकाळी रस्ता खचून एक बेस्टची प्रवासी बस तब्बल 5 फूट खोल खड्ड्यात अडकली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

घटनेचा तपशील काल रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम आज सकाळी गिरगावात दिसून आला. मेट्रो स्टेशनच्या जवळ रस्त्याचा काही भाग खचून पडल्याने मोठा भगदाड निर्माण झाला. त्याच भगदाडात बेस्टची प्रवासी बस अडकली. बस अडकलेली असली तरी सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

बचावकार्य सुरू घटनेनंतर तात्काळ महापालिका, अग्निशमन दल आणि वाहतूक विभाग घटनास्थळी दाखल झाले. सध्या अडकलेली बस बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाने परिसरातील वाहतूक वळवून पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत.

रस्त्यांची अवस्था धोकादायक या दुर्घटनेनंतर मुंबईतील रस्त्यांच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. "रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?" असा सवाल आता सोशल मीडियावर चर्चेला आला आहे. ठिकठिकाणी रस्ते उकरून ठेवलेले असून, महापालिकेच्या अर्धवट कामांमुळे आणि पावसाळ्यापूर्वीच्या दुर्लक्षित नियोजनामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिकांमध्ये संताप स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा