मुंबईतील बांगुर नगर मेट्रो स्थानकात धक्कादायक घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळाली. यलो लाईन - 2 वरील बांगूर नगर मेट्रो स्टेशनवरील मेट्रोमधून एक मुलगा अचानक बाहेर आला, त्यानंतर लगेच मेट्रोचे दरवाजे बंद झाले आणि मुलगा बाहेरच राहिला.
मात्र, यावेळी स्टेशनवर असणाऱ्या कर्मचाऱ्यामुळे तो मुलगा हरवता हरवता वाचला. कारण, तिथे उपस्थित कर्मचाऱ्याने मेट्रो पुढे जाण्याआधीच मेट्रो चालकाला मेट्रोचे दरवाजे पुन्हा उघडण्यास सांगिले, ज्यामुळे मुलगा सुखरुप आत शिरला आणि पुढचा अनर्थ होण्यापासून टळला. मुंबई- गोरेगावमधील मेट्रो स्थानकावर ही धक्कादायक घटना घडली आहे.