ताज्या बातम्या

मुंबईतील मुलुंडमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला; वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू

मुंबईतील मुलुंड येथे नाणेपाडा परिसरातील मोतीछाया इमारतीच्या घरातील स्लॅब कोसळला असून या दुर्घटनेत दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईतील मुलुंड येथे नाणेपाडा परिसरातील मोतीछाया इमारतीच्या घरातील स्लॅब कोसळला असून या दुर्घटनेत दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीमध्ये दोन कुटुंब वास्तव्याला होती. ही इमारत पालिका प्रशासनाकडून धोकादायक म्हणून घोषित केली होती. तरीदेखील काही कुटुंबं या इमारतीमध्ये वास्तव्याला होतं. या दुर्घटनेनंतर या इमारतीमधून सर्व कुटुंबाचं स्थलांतर करण्यात आलं आहे.

या दुर्घटनेत इमारतीत राहणाऱ्या देवशंकर शुक्ला (93) आणि आरखी शुक्ला (87) या दाम्पत्याचा या दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल (सोमवारी) रात्री ही घटना घडली.या घटनेची माहिती मिळताच तात्काळ मुंबई महापालिकेचं पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं. अनेक नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. यामध्ये वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झालं होतं. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. पण रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी