हरियाणात भाविकांच्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मानेसर-पलवल एक्सप्रेसवेवर बसला ही आग लागली. चालत्या बसला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू तर 24 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
देव दर्शनावरून परत येताना ही आग लागल्याची घटना घडली आहे. आग स्थानिकांनी विझवण्याचा प्रयत्न केला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आता पोलीस तपास करत आहेत.