ताज्या बातम्या

अजबच! योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्रीच शिक्षेची फाईल घेऊन कोर्टमधून पळून गेले

कानपूर न्यायालयाने एका प्रकरणात कॅबिनेट मंत्र्याला दोषी ठरवले होते. मात्र, न्यायालय शिक्षा सुनावण्यापूर्वीच मंत्री आपल्या वकिलाच्या मदतीने आदेशाची मूळ प्रत घेऊन पळून गेले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : आपण नेहमी सराईत आरोपी न्यायालयातून फरार पाहिले आहे. परंतु, उत्तर प्रदेशमध्ये चक्क एक कॅबिनेट मंत्रीच आपल्या शिक्षेची फाईल घेऊन पळून गेले, असा आरोप करण्यात आला आहे. कानपूर न्यायालयाने एका प्रकरणात कॅबिनेट मंत्र्याला दोषी ठरवले होते. मात्र, न्यायालय शिक्षा सुनावण्यापूर्वीच मंत्री आपल्या वकिलाच्या मदतीने आदेशाची मूळ प्रत घेऊन पळून गेले. एवढेच नाही तर जामीनपत्र न भरताच त्यांनी कोर्टरूम मधून पळ काढला.

योगी सरकाच्या मंत्रिमंडळात ग्रामोद्योग व वस्त्रोद्योग मंत्री असलेले राकेश सचान यांच्याकडून 1991 मध्ये पोलिसांनी अवैध शस्त्र जप्त केले होते. याप्रकरणी त्याच्यावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात शनिवारी कानपूर न्यायालयात सुनावणी सुरू होती. यादरम्यान न्यायालयाने राकेश सचान यांना दोषी ठरवले. यावेळी त्यांना शिक्षा सुनावण्याची तयारी न्यायालय करत होती. परंतु, राकेश सचान हे दोषी ठरवण्याच्या आदेशाची फाईल घेऊनच न्यायालयातून गायब झाले. यामुळे संपूर्ण न्यायालयात आणि पोलीस-प्रशासनात खळबळ उडाली आहे.

तर, राकेश सचान यांना आजारपणामुळे घेऊन गेल्याचे वकिलांच्या वतीने सांगण्यात आले. परंतु, मंत्र्यांने या केसमध्ये तारीख देणार असल्याने ते न्यायालयातून आधीच बाहेर पडले, असे स्पष्टीकरण दिले आहे. राकेश सचान यांनी गुपचूप कोर्टरूममधून बाहेर पडल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. दरम्यान, शहरातील पोलीस अधिकारी काहीही सांगण्यास टाळाटाळ करत होते.आता न्यायालयाच्या कोतवालीमध्ये मंत्र्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी तक्रार दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा