ताज्या बातम्या

Mangalprabhat Lodha : स्टार्टअप चळवळीने भारताचे वैभव परत आणूया – मंगलप्रभात लोढा

स्टार्टअप चळवळ: भारताच्या प्राचीन वैभवाला पुनःस्थापित करण्यासाठी मंगलप्रभात लोढा यांचा आवाहन.

Published by : Team Lokshahi

भारताच्या प्राचीन वैभवाचा उल्लेख करताना, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्याता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, देशातील प्रत्येक व्यक्तीने स्टार्टअप चळवळीत सहभागी व्हायला पाहिजे. भारताला पुन्हा त्या गौरवशाली स्थानावर पोहोचवले पाहिजे. ते शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

सामान्य प्रशासन विभागातर्फे ५ ते ९ मे दरम्यान 'टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक' हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याचा उद्देश शासकीय यंत्रणेत कार्यरत अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे कौशल्यविकास साधणे हा आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील २४ नावीन्यपूर्ण स्टार्टअप्सनी आपले प्रकल्प सादर केले.

हेल्थटेक, एजटेक, ॲग्रीटेक, पर्यावरणपूरक, उपाययोजना, वाहतूक व्यवस्थापन या क्षेत्रांबरोबरच दिव्यांग व्यक्तींसाठी उपयोगी ठरणारी आहे. एआय आधारित सांकेतिक भाषा रोबोटिक्स, नॅनो बबल तंत्रज्ञानाद्वारे जलशुद्धीकरण आहे. सौर पॅनल कार्यक्षमता वाढवणारे नॅनो कोटिंग्स, खड्डे व रस्त्यांची स्थिती समजणारी एआय प्रणाली, दृष्टिहीन व्यक्तींसाठी स्मार्ट व्हिजन चष्मे, कचरा व्यवस्थापन व सर्क्युलर इकॉनॉमी यांसारखे अनेक उपक्रम येथे सादर झाले.

याशिवाय, माती व पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करणारी बायोटेक सोल्युशन्स, जखमा भरून काढणारे आहे. अत्याधुनिक वॉउंड ड्रेसिंग, थंडावा देणारी जॅकेट्स व हेल्मेट कुलर्स, तसेच हायपर कूलिंग टॉवेल्स या स्वरूपातील नवकल्पनांनी उपस्थितांची दाद मिळवली. या कार्यक्रमाने नवउद्योजकांना एक व्यासपीठ दिले असून, राज्यातील तंत्रज्ञान व नाविन्यतेला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा