ताज्या बातम्या

Delhi Airport : विमानाच्या चाकाजवळ आली कार, दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला

दिल्ली विमानतळावर मोठा अनर्थ टळला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंगळवारी दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) एक कार थेट इंडिगो विमानाच्या (Indigo) चाकाजवळ येऊन थांबली.

Published by : Team Lokshahi

Delhi Airport : दिल्ली विमानतळावर मोठा अनर्थ टळला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंगळवारी दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) एक कार थेट इंडिगो विमानाच्या (Indigo) चाकाजवळ येऊन थांबली. सुदैवाने विमानाचे चाक आणि कारची धडक झाली नाही. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही कार Go First एअरलाइनची होती. ही घटना विमानतळाच्या टर्मिनल T2 च्या स्टॅण्ड क्रमांक 201 वर झाली. या ठिकाणी Go First एअरलाइन्सची कार इंडिगोच्या A320neo या फ्लाइटच्या चाकाजवळ आली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आता, DGCA या प्रकरणाची चौकशी करणार आहे.

कार चालकाची ब्रेथ एनालायझर चाचणी करण्यात आली आहे. कार चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे समोर आले. कार चालकाकडून हा अपघात झोपेत झाला का, याचीही चौकशी केली जात आहे. मंगळवारी, सकाळच्या सुमारास हे विमान दिल्लीहून पाटणासाठी उड्डाण घेणार होते. त्याच्या काही वेळेआधीच ही घटना घडली. सुदैवाने विमानाच्या चाकाला अथवा इतर कोणत्याही भागाला कारने धडक दिली नाही. विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी, काही विशेष कारणांसाठी कारचा वापर विमानतळावर केला जातो. त्यापैकीच ही कार असावी असे म्हटले जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक