Admin
ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी खासदार संजय राऊतांवर नाशिकमध्ये गुन्हा दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवसेनेतील बंडानंतर ठाकरे गटातून शिंदें गटात गेलेले शिवसैनिक योगेश बेलदार यांनी संजय राऊतांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.

संजय राऊतांनी भाजपसह शिंदे गटातील नेत्यांचा समाचार घेतला. याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांविरोधात अपशब्द वापरले.

अशातच नशिकमध्येही ठाकरे आणि शिंदे गट यातील संघर्ष वाढला आहे. शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव शिंदे गटाला बहाल केल्यानंतर ठाकरे गटातील मोठ्या नेत्यावर दाखल करण्यात आलेला पहिलाच हा गुन्हा आहे. अमित शाहांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ठाकरे बंधू डोममध्ये दाखल

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश