Tripura Team Lokshahi
ताज्या बातम्या

बनावट कागदपत्रे बनवून त्रिपुराच्या अंडर-19 संघात करणार होता प्रवेश, क्रिकेटपटूवर गुन्हा दाखल

शनिवारी रात्री टीसीएचे प्रभारी सचिव किशोर दास यांनी क्रिकेटपटूविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली.

Published by : Shubham Tate

Tripura : त्रिपुरा अंडर-19 संघात समाविष्ट करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या एका क्रिकेटपटूविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी याबाबत माहिती दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बॅरकपूर येथील रहिवासी आहे.(A case has been registered against the cricketer who was going to enter the U-19 team of Tripura by forging documents)

या क्रिकेटपटूने त्रिपुरासाठी खेळण्यासाठी त्रिपुरा परमनंट रेसिडेंट सर्टिफिकेट (PRTC) आणि रेशनकार्ड यांसारखी बनावट कागदपत्रे तयार केली.सेपाहिजाला जिल्ह्यातील बिशालगड क्रिकेट असोसिएशनने त्याच्या नावाची शिफारस त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनकडे (TCA) अंडर-19 चाचणीसाठी केली होती. TCA ने 11 जुलै रोजी जाहीर केलेल्या अंडर-19 संघात या क्रिकेटपटूचे नाव समाविष्ट करण्यात आले होते.

शनिवारी रात्री टीसीएचे प्रभारी सचिव किशोर दास यांनी क्रिकेटपटूविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली.ज्याच्या आधारे क्रिकेटपटूवर गुन्हा दाखल करण्यात आला.हा क्रिकेटर यापूर्वी उत्तर कोलकाता येथील पाईकपारा स्पोर्टिंग क्लबकडून खेळला होता.तसेच पश्चिम आगरतळा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुब्रत चक्रवर्ती म्हणाले की , "आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत आणि ज्यांनी त्याला बनावट कागदपत्रे मिळविण्यात मदत केली त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत."

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा