Crime
Crime Team Lokshahi
ताज्या बातम्या

धक्कादायक; हिंगणघाट पोलिसांत ठाणेदारावर अत्याचाराचा गुन्हा दाखल

Published by : Team Lokshahi

भूपेश बारंगे, वर्धा

हिंगणघाट पोलीस ठाण्यात पीडितेच्या तक्रारीवरून ठाणेदार संपत चव्हाण यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.पीडित मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार हा धक्कादायक असून तेवढाच संतापजनक आहे. 24 वर्षीय पीडित ही आपल्या कुटुंबाविरुद्ध 5 ऑगस्ट 2021 पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता. त्यावेळी ठाणेदार संपत चव्हाण हे कर्तव्यावर होते.त्यावेळी तू माझ्याशी मैत्री करशील तरच 'मी तुझी तक्रार घेईल' असे पिडीतेला म्हटले.त्यानंतर ठाणेदार संपत चव्हाण हे पीडितेच्या घरी जाऊन शारीरिक संबंध ठेवले तरच तक्रार घेईल.पीडित युवती घरी एकटीच असल्याचे पाहून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.या दरम्यान त्यांनी एक व्हिडिओ काढून व्हिडिओच्या आधारे पीडितेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करून तिच्यावर वारंवार अत्याचार करत असायचा. पीडितेने ठाणेदार यांच्या पत्नीला माहिती देण्यात आल्यावर पत्नीने युवतीला फसवण्याची धमकी दिल्याची तक्रारारीत म्हटले आहे. पीडित मुलीने जवळपास पाच पानामध्ये आपला बयान नोंदविला असल्याचे तक्रार मध्ये दिसत आहे. 6 मार्च रोजी हिंगणघाट पोलीस ठाण्यात ठाणेदार संपत चव्हाण यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या कलामांनी 376 (2)अ, 376 (1),376 (2)(n) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणेदारांने पीडितेवर असाही केला छळ

ठाणेदार संपत चव्हाण यांनी पीडित युवतीचे ठाणेदारकडे विनवणी करायची.माझी तक्रार आहे ती दाखल करा. तिच्याकडे कोणताही पर्याय विनवणी शिवाय उरला नव्हता.याचा गैरफायदा घेत ठाणेदार यांनी वर्दीचा गैरवापर करून पीडितेचा लैंगिक छळ, मानिसक त्रास, ब्लॅकमेल करत राहिला. त्यात पत्नीने पीडितेवर अन्याय केल्याचा आरोप पीडितेने पाच पानाच्या बयानात नोंद केला आहे.

तक्रारीनंतर ठाणेदारांची तडकाफडकी बदली?

21 डिसेंबरला पीडितेने ठाणेदार चव्हाण यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली असता पोलिसविरुद्ध तक्रार असल्याने ही तक्रार पोलीस अधीक्षकाकडे पाठविण्यात येईल असे पीडितेला सांगण्यात आले.त्यानंतर ठाणेदार यांची बदली करून त्यांच्या जागेवर प्रभारी ठाणेदार कैलास फुंडकर यांना पदभार देण्यात आला.ठाणेदार संपत चव्हाण यांची वर्धा येथे तात्पुरती बदली करण्यात आल्याचे समजते.

Rupali Chakankar: EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Rabindranath Tagore: रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्याबद्दल 'या' महत्वाच्या गोष्टी

World Red Cross Day 2024: जागतिक रेडक्रॉस दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या

Rajendra Gavit : राजेंद्र गावित यांचा भाजपामध्ये प्रवेश

MI VS SRH: सुर्यकुमार यादवचे नाबाद शतक! हैदराबादचे 7 गडी राखून केला पराभव