धारावी अंडरग्राउंड मेट्रो स्थानकात रविवारी सकाळी कोब्रा जातीचे पिल्लू आढळल्याने प्रवासी व कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक सर्पमित्र कौशिक केणी आणि ऋशीत सावंत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पिल्लाला सुरक्षितरीत्या पकडत जंगल परिसरात सोडले. पावसाळ्यात साप बाहेर येण्याच्या घटना वाढतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता त्वरित सर्पमित्रांचा किंवा अग्निशमन दलाचा संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.