भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूर मिशन आणि लाहोरवरील हल्ल्यानंतर खवळलेल्या पाकिस्ताननं आज, गुरुवारी रात्री ९.१५ च्या सुमारास जम्मू काश्मीरमधील एअरपोर्ट परिसरात ड्रोनद्वारे हल्ला केला. दरम्यान, जम्मूमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आले असून सायरनही वाजवण्यात सुरूवात केली. तर दुसरीकडे राजस्थानमधील जैसलमेरवरही पाकिस्तानच्या एफ - १६ ने हल्ला केला. त्याला भारताच्या एस- ४०० मिसाइने हाणून पाडले. पाकिस्तानच्या वतीने होणाऱ्या सततच्या हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देत आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर, राजस्थान, पंजाबमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आले असून ते पहाटेपर्यंत तसेच ठेवण्यात येणार आहेत.