थोडक्यात
सोलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत राडा
माजी खासदार चंद्रकांत खैरेंकडून कबुली
खैरेंसमोरच कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती
जिल्हाप्रमुखांनी वादग्रस्त भाषण केल्याने बैठकीत गोंधळ
संतापून चंद्रकांत खैरेंनीच पदाधिकाऱ्यांना झापले
आज सोलापूरात ठाकरेंच्या शिवसेनेची आढावा बैठक पार पडली. यामध्ये खासदार चंद्रका खैरेंकडून कबुली जबाब दिला. या बैठकीमध्ये शिवसेनेच्या एका जिल्हाप्रमुखांनी वादग्रस्त भाषण केल्याने बैठकीत मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी खैरे समोर राडा घातला. समोर बसलेले कार्यकर्ते एकामेकांच्या अंगावर धावून आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान वादग्रस्त जिल्हाप्रमुखांवर कारवाई करणार असल्याची माहिती मिळत आहे.
चंद्रकांत खैरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली, त्यावेळी ते म्हणाले की, "घडलेला प्रकार मी उद्धव साहेबांच्या कानावर घालणार, हे जुने लोकं स्वतःला काय समजतात माहिती नाही.मी त्या कार्यकर्त्यांना झापलं आणि मी बैठक सोडून चाललो, उद्धव साहेबांना सांगतो असे म्हणालो. कधी काँग्रेस मध्ये जायचे परत यायचे हे योग्य नाही. मीच हे करू शकतो असे म्हणतात. हा प्रकार गैर असून याबाबत कारवाई करावी लागणार आहे, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे."