अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump यांच्यावरील टिप्पणीनंतर वाद निर्माण झाला. या वादानंतर भाजप खासदार कंगना रनौत Kangana Ranaut ने तिच्या सोशल मीडिया Social Media वरील एक पोस्ट Post हटवली आहे. या पोस्टमध्ये कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदीं Narendra Modi ची तुलना डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी करत त्यांना ‘सर्व अल्फा पुरुषांचे बाप’ असे संबोधले होते. या वादग्रस्त पोस्टनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा J. P. Nadda यांनी तिला फोन करून तिला ही पोस्ट हटवण्याची सूचना दिली, असे कंगनाने एका नव्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.
कंगनाने तिच्या नव्या वक्तव्यात सांगितले की, “जेपी नड्डा सरांनी मला कॉल करून सांगितले की, मी ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांच्याशी भारतात उत्पादन न करण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरची माझी प्रतिक्रिया हटवावी. मी ती पोस्ट तात्काळ डिलीट केली असून, माझ्या वैयक्तिक मताच्या अनुषंगाने मी ती पोस्ट टाकल्याबद्दल मला खंत आहे.”
कंगानाने पोस्टमध्ये नेमकं काय लिहिले?
डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच केलेल्या एका वक्तव्यात म्हटले होते की, “मी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना सांगितले की भारतात कारखाने उभारू नयेत. आम्हाला त्यात रस नाही. भारताने स्वतःची काळजी घ्यावी.”
याच पार्श्वभूमीवर कंगनाच्या वक्तव्याने नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले होते. मात्र पक्षाच्या सूचनेनंतर तिने त्वरित प्रतिक्रिया मागे घेतल्याने आता हा वाद निवळण्याची शक्यता आहे.