मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मराठा समाज आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ‘चलो दिल्ली’ असा नारा दिला आहे. याच पार्श्वभूमिवर ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी 'चौथी नापास दिल्लीत जाऊन काय करेल ? असा प्रश्न उपस्थित करुन हाकेंनी चिडचिड व्यक्त केली आहे.
यादरम्यान लक्ष्मण हाके जरांगेंवर निशाणा साधत म्हणाले की, "जरांगे पाटलांनी दिल्लीला नाही तर अमेरिकेला नाहीतर अरब अमिरातला जावं, जरांगे पाटील तुम्ही दिलेला कधी गेला नव्हता. इतिहासात जायला भाग पाडू नका. मागासवर्गीयांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये थोडं काही प्रतिनिधित्व मिळायला लागलं होतं, त्यांचे ताट उधळून लावणारा तू, चौथी नापास".
"दिल्लीत जाऊन काय करेल हा? देशाच्या लोकसंख्येमध्ये तुमचा टक्का किती? देशामधल्या ओबीसींची संख्या किती? त्यामुळे मंडल आयोगाला चॅलेंज करेन, अमुक करेन- तमुक करेन, रिझर्वेशनचा स्पेलिंग लिहिता येते का ते बघ आधी. मगं मोठ्या मोठ्या बाता मार"
तसेच, जरांगे तू दिल्लीला जा आम्ही गाव गाड्या महाराष्ट्रात फिरतो, मुंबई कशी पॅक करायची हे आम्ही दाखवून देणार, असा इशारा देखील लक्ष्मण हाके यांनी जरांगेंना दिला आहे.