Ulhasnagar Crime News: उल्हासनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. भरतनगर परिसरात सासू- सासरे आणि पत्नीच्या भावावर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये रेखा गावडे ,चिदानंद गावडे आणि करण गावडे जखमी झाले आहेत. दरम्यान समाधान बाविस्कर असं हल्ला करणाऱ्या जावयाचं नाव आहे.
समाधान बाविस्कर यांच 20 मे रोजी चिदानंद गावडे यांच्या मुलीशी लग्न झाले होते. मुलीची हे दुसरं लग्न होते. काहीदिवसानंतर नवविवाहित जोडप्प्यामध्ये खटके उडू लागले. रोजच्या वादाला कंटाळून चिदानंद गावडे यांची मुलगी आणि त्यासोबतच तीने आपल्या संसार उपयोगी वस्तू माहेरी घेऊन आली. त्याचवस्तू परत घेण्यासाठी आरोपी समाधान हा त्याच्यासोबत 12-13 माणसं घेऊन आला. वस्तू देण्यास मनाई केल्यानंतर त्याने लोखंडी रॉड आणि काठीने सासू- सासरे आणि पत्नीच्या भावांवर जीवघेणा हल्ला केला. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.