ताज्या बातम्या

Dhangar Reservation : धनगर समाजाचे शिष्टमंडळ सह्याद्री अतिथीगृहावर दाखल

धनगर समाजाचे शिष्टमंडळ सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आरक्षणाच्या मागणीबाबत चर्चा करणार आहेत.

Published by : Team Lokshahi

धनगर आरक्षणाचा मुद्दा सध्या जोर धरू लागला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यामागणीसाठी पंढरपुरात उपोषण सुरु आहे. या आंदोलना दरम्यान सरपंचाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. धनगर आरक्षणाची धग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. धनगर समाजाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहे.

पंढरपुरात आंदोलन करत असलेल्या उपोषणकर्त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत असल्याची शिष्टमंडळाने तक्रार केली आहे. आरक्षणासंबंधी सरकारने त्वरित निर्णय घेऊन तोडगा काढावा अशी विनंती शिष्टमंडळ करणार आहे.

थोड्या वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीला मंत्री शंभूराजे देसाई, धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांच्यासोबत इतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा