ताज्या बातम्या

रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली परिमंडळ 6 च्या पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांची भेट

मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण देण्याची मागणी योग्य आहे. एस. सी. एस .टी. ओबीसी अन्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता ओबीसी दर्जाचा स्वतंत्र प्रवर्ग करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे.

Published by : Team Lokshahi

मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण देण्याची मागणी योग्य आहे. एस. सी. एस .टी. ओबीसी अन्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता ओबीसी दर्जाचा स्वतंत्र प्रवर्ग करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पक्ष मराठा आरक्षण आंदोलनात मराठा बांधवांच्या खांद्याला खांदा लावून लढेल, असे मत आज रिपब्लिकन पक्षाचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे यांनी व्यक्त केले.

मराठा आंदोलनाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचे वतीने आज दि. 3 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित केलेले आंदोलन रद्द करण्यात आले आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी त्यांचे आंदोलन स्थगित केल्यामुळे त्यांना पाठिंबा देणारे रिपाइंचेही आंदोलन स्थगित केले केल्यानंतर चेंबूर येथील परिमंडळ 6 चे पोलीस उपायुक्त श्री. हेमराज राजपूत यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी रिपाइंचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे, महादेव साळवे, सुनील बन्सी मोरे, हेमंत रणपिसे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा राहिल. मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यावे ही रिपाइंची मागणी निवेदनाद्वारे रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे यांनी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा