तिकीटघर कोणत्या दिशेला आहे ?वेटिंग रूम कुठे आहे? असं नवीन रेल्वे प्रवाशांना विचारत बसण्याची आता गरज नाही. कारण विदर्भात नागपूर विभागासह २५ रेल्वे स्थानकात प्रवाशांना आवश्यक सेवा सुविधांची माहिती देण्यासाठी डिजिटल मॅप (नकाशा)कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने डिजिटल इंडिया च्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.
बाहेरगावाहून आलेल्या बहुतांश प्रवाशांना वेटिंग रूम waiting room , तिकीट काउंटर, ticket counter पोलीस स्टेशनची माहिती नसते. आजच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला कोणाला विचारण्याची सोय ही राहिली नाही. त्यामुळे बऱ्याचदा प्रवाशांना प्रवासी मदत केंद्र (इन्फॉर्मशन काउंटर ) कडे धाव घेतात. पण तिथे लांबच लांब रांगेचा सामना प्रवाशांना करावा लागतो. परिणामी नवीन प्रवाशांना माहिती मिळवण्यासाठी इकडे तिकडे चकरा माराव्या लागतात. पुन्हा दुसऱ्याकडे विचारणा करावी लागते. अश्या प्रचंड मनस्ताप देणाऱ्या प्रक्रियेतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने डिजिटल मॅपची संकल्पना चालू केली आहे.
मध्य रेल्वेने नागपूर विभागातील २५ स्थानकांवर डिजिटल नकाशाची सुविधा चालू केली आहे. यामुळे प्रवाशांना प्लॅटफॉर्म तसेच रेल्वे परिसरात असलेल्या वेटिंग रूम दिव्यांग तिकीट काउंटर , शौचालय, पाण्याचे नळ, कुलर , लिफ्ट ,फुट ओव्हर ब्रिज, प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि अन्य माहिती सुद्धा या डिजिटल मॅप मुळे मिळणार आहे. ही सेवा दिवसाच नाही तर २४ तास अनुभवता येणार आहे . ही सेवा सध्या नागपुर, वर्धा, सेवाग्राम, चंद्रपुर , हिंगणघाट , भांदक , काटोल , नरखेड , पुलगाव , धामणगाव , चांदुर , पांढुर्णा , मुल्ताई , आमला , बैतुल या स्थानकात सध्या कार्यान्वित आहे .