jagdeep dhankhar Vs mallikarjun kharge 
ताज्या बातम्या

राज्यसभेत गदारोळ, उपराष्ट्रपती धनखड आणि खर्गेंमध्ये जोरदार वाद

राज्यसभेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात तुफान बाचाबाची झाली. विरोधकांनी धनखड यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.

Published by : Team Lokshahi

भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात इंडिया आघाडीनं अविश्वास प्रस्ताव आणला आहे. राज्यसभेचे सभापती म्हणून सभागृहाची कारवाई पार पाडताना जगदीप धनखड पक्षपातीपणा करतात, असा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यावरून संसदेत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं.

थोडक्यात

  • राज्यसभेत जोरदार गदारोळ

  • राज्यसभा सभापती धनखड आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये बाचाबाची

  • मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून सहन होत नाही-धनखड

  • मीही मजुराचा मुलगा-मल्लिकार्जुन खर्गे

काय घडलं संसदेत?

सभापती जगदीश धनखड आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात बाचाबाची झाली. एक शेतकऱ्याचा मुलगा या पदावर बसल्याचं तुम्हाला सहन होत नसल्याचं म्हणत धनखड यांनी विरोधकांना उद्देशून म्हटलं. तर मीही मजुराचा मुलगा असल्याचं प्रत्युत्तर खर्गेंनी दिलं. यानंतर सभागृहात एकच गोंधळ सुरू होता. त्यामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. आता सोमवारी राज्यसभेचं काम होणार आहे.

भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड म्हणाले, "मी तुम्हाला विचार करायला सांगत आहे. तुमची देहबोली पहा आणि तुम्ही काय म्हणत आहात याकडे लक्ष द्या. मी आतापर्यंत खूप सहन केले. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी दुर्बल होणार नाही. मी या देशासाठी मरेन. शेतकऱ्याचा मुलगा या पदावर का बसला आहे. त्याचा तुम्ही विचार करत नाही. आजचा शेतकरी हा केवळ शेतीपुरता मर्यादित नाही. धनखड म्हणाले, तुम्ही आधी नियम वाचा. अविश्वास प्रस्ताव आणला तर तो 14 दिवसांत येईल. मी तुम्हाला वेळ काढून मला भेटण्याची विनंती करतो. तुम्ही येत नसाल तर मी येईल.

यावर काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, तुम्ही जर शेतकऱ्याचा मुलगा असाल तर मीही मजुराचा मुलगा आहे. दरम्यान, भाजपने राज्यसभेतील आपल्या खासदारांनी व्हिप जारी केला आहे. 16 आणि 17 डिसेंबर 2024 रोजी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी तीन लाईनचा व्हिप जारी केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा