कसारा परिसरात सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणाचा मुद्दा पुढे करत रेल्वे प्रशासनाने दुकाने व घरांवर नोटिसा बजावल्या आहेत. या कारवाईमुळे स्थानिक व्यापारी आणि रहिवासी अस्वस्थ झाले असून, अनेक कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रेल्वे हद्द आधीच भिंतीद्वारे ठरवली असताना पुन्हा दुकाने हटवण्याचा आग्रह का, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. बाजारपेठ रेल्वे परिसरालगतच विकसित झाल्याने इथल्या लहान व्यवसायांवर गावाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे.
नोटिसांनंतर शेकडो दुकानदार आवश्यक कागदपत्रांसह मुंबईतील संबंधित रेल्वे कार्यालयात जाण्याची तयारी करत आहेत. प्रशासनाकडून दिलासा मिळेल, या अपेक्षेने संपूर्ण कसारा गाव वाट पाहत आहे. वर्षानुवर्षे उभ्या राहिलेल्या दुकानांवर कुटुंबांचा संसार, मुलांचे शिक्षण अवलंबून आहे. ही दुकाने हटली तर गावाच्या बाजारपेठेची रौनकही हरपेल, अशी भीती स्थानिक व्यक्त करत आहेत.
थोडक्यात
• कसारा परिसरात सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणाचा मुद्दा पुढे
• रेल्वे प्रशासनाकडून दुकाने व घरांवर नोटिसा बजावल्या
• कारवाईमुळे स्थानिक व्यापारी व रहिवासी अस्वस्थ
• दुकानदारांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण
• अनेक कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण
• संभाव्य बेदखलीमुळे सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता