A 'game-changer' twist in the NCP merger! Fadnavis's single condition creates a stir in political circles. 
ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर ‘गेमचेंजर’ ट्विस्ट! फडणवीसांची एकच अट आणि राजकीय वर्तुळात खळबळ

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांबाबत नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही नेत्यांनी 12 फेब्रुवारीला दोन्ही गट एकत्र येणार असल्याचे संकेत दिले होते.

Published by : Riddhi Vanne

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांबाबत नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही नेत्यांनी 12 फेब्रुवारीला दोन्ही गट एकत्र येणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांनी या चर्चांना दुजोरा न देता, बारामतीतील बैठक ही फक्त स्थानिक निवडणुकांसंदर्भात होती, असे स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा खरोखर झाली असती, तर अजित पवार यांनी आम्हाला आधीच सांगितले असते, असे फडणवीस म्हणाले. अजित पवार यांचा पक्ष स्वतंत्र आहे आणि त्यांचे निर्णय तेच घेतात, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

तसेच भविष्यात दोन्ही गट एकत्र येणार असतील, तर आधी भाजपाशी चर्चा होणे आवश्यक आहे, अशी अट फडणवीस यांनी ठेवली. सध्या अजित पवार गट सत्तेत असून शरद पवार गट विरोधात आहे. त्यामुळे पुढे नेमकं काय घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा