का कुणाला येत नाही आम्हा पुरुषांची कीव,
खोट्या केसेस टाकून बायकांनी घेतले किती जीव !!
हे वाक्य पत्नीपीडितांच्या मनांमनांत घुमतंय. महिलांप्रमाणेच पुरुषांनाही त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची वाचा फोडण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळावं, अशी मागणी राज्यभरातील पत्नीपीडित पुरुष करत आहेत. नुकताच नाशिकमध्ये पुरुष स्वाभिमानी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पत्नीपीडित पुरुषांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला उपस्थित राज्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या पत्नीपीडित पुरुषांनी आपल्या व्यथा मांडल्या. तसेच महिला आयोगप्रमाणेच पुरुष आयोगही स्थापन करण्यात यावे, अशी मागणी यावेळी एकमताने करण्यात आली.
महिलांप्रमाणेच पुरुषांनाही लग्नानंतर पत्नीच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे अनुभव या मेळाव्यात काही पुरुषांनी मांडले. या ठिकाणी त्यांच्या समुपदेशनासह त्यांना न्यायालयिन मार्गदर्शनही पुरुष स्वाभिमानी फाऊंडेशनच्या वतीने देण्यास आले. अनेकांनी आपले मनं मोकळे करत हा एक स्तुत्य उपक्रम असून पुरुषांसाठीही आयोग स्थापन करावा, अशी मागणी केली आहे. फाऊंडेशनच्यावतीने पुरुषांसाठी हेल्पलाईन नंबरदेखील जारी केला आहे.