Team Lokshahi
ताज्या बातम्या

दहावीत शिकणाऱ्या मुलीने वस्तीगृहाच्या खोलीत गळफास घेऊन केली आत्महत्या...

गजानन वाणी -हिंगोली जिल्ह्यातील दहाविच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे.

Published by : shweta walge

गजानन वाणी हिंगोली : गजानन वाणी -हिंगोली जिल्ह्यातील दहाविच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. कळमनुरी तालुक्यातील बोथी येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेच्या वस्तीगृहात तिने ओढणीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.

शिवानी सदाशिव वावधने अस या शाळकरी विद्यार्थिनीच नाव असून इयत्ता पाचवीपासून ती याच शाळेत वस्तीगृहात राहून शिक्षण घेत होती. दुपारच्या सुट्टी नंतर ती वर्गातच गेली नाही. आश्रम शाळेच्या वस्तीगृहातील राहत्या खोलीत स्वतःच्या ओढणीने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर मुलीचा मृतदेह पोलिसांनी तपासला असता तिच्या डाव्या हातावर ब्लेडने कापल्याच्या खुणा दिसून आल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत विद्यार्थिनीच्या वडिलानी शिवाणीच्या मृत्यूला शाळा व्यवस्थापनाला जबाबदार धरत आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक खांडरे आणि वसतिगृहाच्या वार्डन विणकरे यांच्यावरआत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सदर मुलीचा मृतदेह पोलिसांनी तपासला असता तिच्या डाव्या हातावर ब्लेडने कापल्याच्या खुणा दिसून आल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. जुन्या - नव्या ब्लेडच्या कापलेल्या खुणा कशाच्या आहेत? याचाही शोध पोलीस घेत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा