मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षी मनसेच्यावतीने दीपोत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार आहेत.
दिपोत्सवाच्या दिशेनं ठाकरे बंधूचा एकाच गाडीतून प्रवास..
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दिपोत्सवात एकाच गाडीतून पोहोचले... तर आदित्य आणि अमित ठाकरेंचाही एकाच गाडीतून प्रवासउद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दिपोत्सवात एकाच गाडीतून पोहोचले... तर आदित्य आणि अमित ठाकरेंचाही एकाच गाडीतून प्रवासउद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दिपोत्सवात एकाच गाडीतून पोहोचले... तर आदित्य आणि अमित ठाकरेंचाही एकाच गाडीतून प्रवास
दिपोत्सवाच्या ठिकाणी रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंची एका गाडीतून प्रवास
शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सव सोहळ्याचे उद्धाटन 17 तारखेला होणार असून या दीपोत्सवाचे उद्धाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
बऱ्याच वर्षांनंतर ठाकरे बंधूंची ही एकत्र दिवाळी पाहायला मिळणार आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या 3 महिन्यांत 6 भेटी झाल्या असून मनसे आयोजित दीपोत्सवाचं यंदाचं तेरावं वर्ष आहे.
राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देत स्वागत केलं.
दिपोत्सवाच्या ठिकाणी शर्मिला ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना पुष्पगुच्छ देत स्वागत केलं.
दिपोत्सवानंतर उद्धव ठाकरेंनी भाषण केले. "त्यामध्ये आजची दिवाळी वेगळी आहे. मराठी माणसांला एकत्र घेऊन जाणारी ही दिवाळी आहे", असे म्हटले आहे.
शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सव सोहळ्याचे उद्धाटन 17 तारखेला होणार असून या दीपोत्सवाचे उद्धाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करुन कार्यक्रम पार पडला.