Kolhapur Shocking News :कोल्हापूरातील धक्कादायक घटना ! 10 वर्षाच्या बालकाने आईच्या मांडीवर सोडला प्राण Kolhapur Shocking News :कोल्हापूरातील धक्कादायक घटना ! 10 वर्षाच्या बालकाने आईच्या मांडीवर सोडला प्राण
ताज्या बातम्या

Kolhapur Shocking News : कोल्हापूरातील धक्कादायक घटना ! 10 वर्षाच्या बालकाने आईच्या मांडीवर सोडला प्राण

खेळकर, निरागस आणि आनंदी स्वभावाचा हा मुलगा आईच्या मांडीवरच शेवटचा श्वास घेतोय, ही बातमी कळताच परिसरात शोककळा पसरली.

Published by : Team Lokshahi

पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावात बुधवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. आनंदनगर वसाहतीतील शिवनेरी गल्ली येथे राहणारा श्रावण अजित गावडे (वय १०) याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. खेळकर, निरागस आणि आनंदी स्वभावाचा हा मुलगा आईच्या मांडीवरच शेवटचा श्वास घेतोय, ही बातमी कळताच परिसरात शोककळा पसरली.

श्रावण हा बुधवारी संध्याकाळी आपल्या मित्रांसोबत गणेश मंडळाच्या शेडमध्ये खेळत होता. खेळात गुंग झालेला तो अचानक अस्वस्थ झाला आणि घाईघाईने घरी परतला. आईच्या कुशीत विसावताच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. काही क्षणांतच त्याचे प्राण आईच्या डोळ्यांसमोर निघून गेले. तिच्या आक्रोशाने आणि किंकाळ्यांनी वातावरण दणाणून गेले.

घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर तो आधीच मृत झाल्याचे स्पष्ट केले. केवळ दहा वर्षांचा असताना श्रावणने कुटुंबाला आणि मित्रांना कायमची साथ सोडली.

श्रावण हा स्थानिक शाळेत चौथी इयत्तेत शिक्षण घेत होता. तो कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता. यापूर्वीच चार वर्षांपूर्वी गावडे कुटुंबाने आपली मुलगी गमावली होती. आता मुलाच्याही अकाली निधनाने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेने कोडोली गाव शोकाकुल झाले असून, शेजारी, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांनी गावडे कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत आपली संवेदना व्यक्त केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा